![]()
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी २० जून रोजी दिल्लीत बेमुदत आंदोलन पुकारले आहे. राजीनामा न झाल्यास देशभरात आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली. नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशातील सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी अभिजीत दिपके यांची मागणी आहे. अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुणे येथील आंदोलनानंतर लखनौ, अमृतसर, बंगळूर आणि जयपूर येथेही आंदोलने करण्यात येतील. त्यानंतरही राजीनामा न झाल्यास २० जून रोजी दिल्लीत बेमुदत आंदोलन केले जाईल, ज्यात देशभरातील लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, तर त्यांनी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असे दिपके म्हणाले. ६ जून रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनात देशाच्या विविध भागातून लोक सहभागी झाले होते आणि ते पैसे देऊन आणले नव्हते. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा दिपके यांनी केला. दहशतवादी मदत घेतली जात असल्याच अपप्रचार कोणताही राजकीय पक्ष सोबत नसला तरी, विद्यार्थी मुद्द्यावर अनेक जणांना सोबत घेणार असल्याचे दिपके यांनी सांगितले. त्यांच्या पक्षाच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने मोठे बदल होणार नसले तरी, सरकारला आपली चूक कळेल, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या आंदोलनाला कोणत्याही परदेशी लोकांचे अर्थसहाय्य नसतानाही दहशतवादी मदत घेतली जात असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील तरुणांना योग्य संधी मिळत नाही अभिजीत दिपके यांनी आपण देशातच राहणार असून अमेरिकेला परत जाणार नसल्याचे सांगितले. अमेरिकेत नोकरी करून स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता, परंतु पक्षाच्या हितचिंतकांनी ही चळवळ पुढे नेण्याचे ठरवले. अमेरिकेतील सर्व आयटी कंपन्या भारतीय चालवत असतानाही, आपल्या देशातील तरुणांना योग्य संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Source link
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आग्रही:20 जूनला दिल्लीत बेमुदत आंदोलन, अभिजीत दिपकेंचा एल्गार; लखनौ, अमृतसरमध्येही आंदोलन