Headlines

अर्भक मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा भोवला:एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत, एकाची वेतनवाढ थांबवली; सीईओंचे आदेश




औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणाच्या कारणावरून एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत करण्यात आला असून एकाची वेतनवाढ थांबविण्यात आली तर चालकास कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील एक गरोदर महिला ता. २६ मे रोजी उपचारासाठी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र महिलेची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेसाठी डिझेल व चालक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णवाहिेकेद्वारे हिंगोली येथे आणले होते. मात्र यावेळी प्रसुती दरम्यान, महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या पथकाने चौकशी करून जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला होता. यामध्ये वैद्यकिय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणे तसेच निष्काळजीपणाच्या आरोपा वरून वैद्यकिय अधिकारी डॉ. मारोती केंद्रे यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ. अक्षय पुरजळकर यांची एक वेतनावाढ थांबविण्याचे आदेश दिले असून चालक रंजवे यास कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहेत. या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *