Headlines

Runaway in Trinamool, Mamata Banerjee talks about ‘returning home’ in Congress, Mamata’s meeting with Sonia, Abhishek with Rahul Gandhi


  • Marathi News
  • National
  • Runaway In Trinamool, Mamata Banerjee Talks About ‘returning Home’ In Congress, Mamata’s Meeting With Sonia, Abhishek With Rahul Gandhi

मुकेश कौशिक | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभव व पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. बुधवारी टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची सुमारे दोन तास भेट घेतली. या वेळी टीएमसीचे खासदार डेरेक ओ’ब्रायन हे देखील उपस्थित होते.

एक दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विलीनीकरणाच्या बातम्या ‘निराधार’ आहेत. ममता यांनी या भेटीत विरोधी पक्षांच्या एकजुटीवर भर दिला आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा अजेंडा राज्यसभा निवडणूक आणि पक्ष संघटन असल्याचे सांगण्यात आले आहे.

तडजोड की विलीनीकरणावर चर्चा?

सूत्रांनुसार, विलीनीकरण झाल्यास ममतांना संघटनेत आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका मिळावी, अशी ममता गटाची इच्छा आहे. अभिषेक बॅनर्जींना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी मिळावी. काँग्रेस सूत्रांनुसार , राहुल गांधींनी विनाशर्त विलीनीकरणाची अट ठेवली. दोन्ही पक्षांच्या संघटनात्मक व आर्थिक संरचनांच्या विलीनीकरणावरही चर्चा सुरू आहे. पण, कोणीही दुजोरा दिला नाही.

ही मजबुरी का? : टीएमसीचे ८० पैकी ५८ आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत गेले. ऋतब्रत विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले. लोकसभेत काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली. दुसऱ्या गटाला मान्यता मिळाली तर ममतांच्या राजकीय अस्तित्वावर संकट येईल. अशा स्थितीत अस्तित्वासाठी काँग्रेसशी तडजोड करणे हा पर्याय आहे.

  • तृणमूल खासदार कीर्ती आझादांनी विलीनीकरण शक्यता फेटाळली. ते म्हणाले, असे काही होणार असेल तर दीदी निर्णय घेऊन सांगतील.’
  • बंगालमधील विरोधी पक्षनेते ऋतब्रत म्हणाले, ‘ना आम्ही काँग्रेससोबत जात आहोत, ना आमचे खासदार. मग विलीनीकरण कोण करणार? ’

आता सुष्मिता यांचाही राज्यसभेचा राजीनामा; १९ बंडखोर लोकसभा खासदारांमध्ये शत्रुघ्न सिन्हा..

राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी टीएमसी आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणांहून राजीनामा दिला आहे. सभापतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. आसामच्या सुष्मिता यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली. पक्ष व सभागृहाचे सदस्यत्व सोडणाऱ्या त्या दुसऱ्या राज्यसभा खासदार आहेत. काकोली घोष गटाने शत्रुघ्न सिन्हा, सायोनी घोष, माला रॉय, दीपक अधिकारी, शताब्दी रॉय, रचना बॅनर्जी, पार्थ भौमिक, खलीलुर रहमान, अबू खान, मिताली बाग, जून मालिया, अरूप चक्रवर्ती, शर्मिला सरकार, असीत माल, बापी हलदार, कालीपद सोरेन, जगदीश बसुनिया, युसूफ पठाण यांच्या समर्थनाचा दावा केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *