![]()
विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी ठरलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचे बंड शमवण्यात अखेर यश आले आहे. बुधवारी शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले. अखेर मुंबईत पुन्हा मंत्री सामंत व महाजन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत गितेंनी माघारीची तयारी दर्शवली. या निर्णयाची अधिकृत आणि संयुक्त घोषणा गुरुवारी नाशकात केली जाणार आहे. दिल्लीहून हलली सूत्रे गितेंमुळे महायुतीच्या दराडेंपुढे आव्हान निर्माण झाले होते. मंत्री उदय सामंत यांना चार दिवस तळ ठोकूनही यश येत नव्हते. मंत्री भुसे, मंत्री महाजन यांनी तासन््तास मनधरणी करूनही तोडगा निघत नव्हता. अखेरीस उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीत भाजप नेत्यांशी संपर्क साधला. मग मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत संदेश दिल्याने गिते यांना माघार घ्यावी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Source link
विधान परिषद निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार:मुख्यमंत्र्यांचा संदेश ठरला ‘गेमचेंजर’, आज घाेषणा