![]()
जून महिना उजाडला मान्सूनच्या पहिल्या पावसाची चाहूल लागली. यंदा पावसाने सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसला. पाऊस काही मिनिटेच झाला असला तरी वादळी पावसाने चांगलेच नुकसान केले. याचा फटका पालेभाज्याच्या पिकांनाही बसला. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक मंदावली असून बाजारभाव दुपटीने वाढले आहेत. अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, केडगाव उपनगर, नालेगाव परिसरात मोठा बाजार भरतो. मुख्य बाजारपेठेत चितळे रोडवरील भाजीपाला बाजार, तर सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक व गुलमोहोर रोडवरील पारिजात चौकाजवळ, बालिकाश्रम रोड, तपोवन रोड, तसेच उर्वरित पान ४ मागणी घटल्याने लिंबू स्वस्त एप्रिल व मे महिना कडक उन्हाळ्याचे होते. या दोन महिन्यात शहराचे तापमानाने ४१ अंशाचा आकडा ओलांडला. त्यामुळे सरबतासाठी लिंबाला प्रचंड मागणी वाढली होती. या तुलनेत आवक कमी असल्याने लिंबाचे दर तब्बल १४० रुपये प्रतिकिलो झाले होते. आता पावसाळा सुरु होत असल्याने व मागणी घटल्याने हे दर थेट शंभर रुपयांनी घसरले आहेत. हवामान बदलाचा फटका जून महिन्यात पावसाची हजेरी लागताच पालेभाज्यांची आवक वाढते. त्यामुळे पालेभाज्यांचे दर जुडीमागे ५ ते १० रुपयांनी स्वस्त होतात. यंदा मात्र वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. शहरात नगर तालुक्यातील नेप्ती, वाळकी, जेऊर, आदी गावांतून पालेभाज्यांची आवक होते. ती मंदावल्यामुळे पालेभाज्यांचे दर दुपटीने महागले आहेत.
Source link
पालक, मेथी, कोथिंबीर 10 ते 20 रुपयांनी महाग:वादळी पावसाचा तडाखा; आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले