Headlines

नेहरूंचा विक्रम मोडल्याबद्दल अभिनंदन:पण महागाई-बेरोजगारीचेही विक्रम तुमच्याच नावावर, सिद्धिविनायक मंदिरात पुजा करत मनसेचा उपरोधिक टोला




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम करत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. यानिमित्त भाजपकडून जल्लोष सुरू असतानाच मनसेने मात्र वेगळ्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिली. सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करत मनसेने मोदींचे अभिनंदन केले, पण त्याचवेळी महागाई, पेट्रोल-गॅस दर, बेरोजगारी आणि पत्रकार परिषद न घेण्याच्या विक्रमांवरून उपरोधिक टोला लगावला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांमध्ये उपरोधाचा सूर स्पष्ट दिसून आला. मनसेने लावलेल्या बॅनर्सवर, सर्वाधिक महागाईचा दर, सर्वाधिक पेट्रोल दर, सर्वाधिक घरगुती गॅस दर, सर्वाधिक बेरोजगारी आणि एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम अशा उल्लेखांसह मोदींचे अभिनंदन करण्यात आले. बाबूमोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए…
यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, “बाबूमोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं… कुठल्या व्यक्तीने किती वर्ष पदावर राहिलं यापेक्षा त्या काळात किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं आहे.” त्यांनी भाजपच्या अभिनंदन सोहळ्याला प्रत्युत्तर देताना मोदींच्या कार्यकाळातील विविध मुद्द्यांवर टीका केली. बेरोजगारीचे आकडे विक्रमी पातळीवर..
देशपांडे यांनी पुढे म्हटले की, काल भाजपने सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली होती, त्यामुळे मनसेनेही आपल्या पद्धतीने बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. “डॉलरचा दर, पेट्रोल-डिझेलचे भाव, घरगुती गॅसच्या किमती आणि बेरोजगारीचे आकडे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. हेही मोदींच्याच नावावरचे विक्रम आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा
तसेच, “आम्ही कुणाचे बॅनर काढले नाहीत. आम्ही फक्त सत्य मांडलं आहे. गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देवो, सूडबुद्धी नको,” असे म्हणत त्यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. मोदींच्या विक्रमाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या राजकीय शाब्दिक चकमकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चा आज पुण्यात एल्गार: दिल्लीतील आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *