![]()
ऐतिहासिक नगरी मंगळवेढ्यातील प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ऐतिहासिक महादेव विहिरीत (पुष्करिणी) शतकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या १२ व्या शतकातील दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्तीचे जतन आणि सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय व वैयक्तिक स्तरावर मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच या महादेव विहिरीचे संवर्धन व जतन करण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगरपालिकेकडून कंत्राटी पद्धतीने हे काम करून घेण्यात येत आहे. मंगळवेढ्याचा हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित राहावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. नगरसेवक अरुण बाळासाहेब किल्लेदार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून इतिहासकालीन महादेव विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे (पुनर्नविकरण) काम मंजूर झाले आहे. या अंतर्गतच विहिरीच्या पोटात असलेली दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्ती जतन करणे आणि त्या परिसराचे सुशोभीकरण करणे या अत्यंत महत्त्वाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. या मूर्तीला तिचे गतवैभव मिळवून देण्यासाठी इतिहास, जुन्या वास्तू आणि गड-किल्ल्यांचे अभ्यासक ॲड. आनंद देशपांडे आणि बंडू सबनीस हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. विहिरीच्या पाण्यात आणि गाळात अडकलेली ही मूर्ती सुरक्षित राहावी, यासाठी त्यांनी यापूर्वीही अनेक प्रयत्न केले आहेत. काशी विश्वनाथ तीर्थ संवर्धनाच्या या मोहिमेत या मूर्तीला अत्यंत सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढून, काठावर ठेवण्यात आले आहे, मूळ स्वरूपात आल्यानंतर ब्रह्मदेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात ^१२ व्या शतकात कलचुरी साम्राज्याची महामंडलेश्वर राजधानी असलेल्या मंगळवेढ्यात मोगली आक्रमणात अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्या काळापासून आजतागायत महादेवाच्या मंदिराशेजारी असणाऱ्या महादेव विहिरीत ब्रह्मदेवाची मूर्ती सुस्थितीत आहे. भारतामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती स्वरूपात पूजा होणारी मोजकीच ठिकाणे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अभ्यासकांच्या सुरू असलेल्या या संवर्धन प्रयत्नांना जर पुरातत्व विभागाची मदत मिळणे आवश्यक आहे, तर मंगळवेढ्याच्या सांस्कृतिक वारसा जतन होईल. ॲड. आनंद देशपांडे, (जुन्या वास्तू आणि गड-किल्ल्यांचे अभ्यासक) करण्यात येणार आहे. संवर्धनाचे हे प्रयत्न सुरू झाले असले, तरी या मोहिमेला पूर्ण यश मिळवून देण्यासाठी आता पुरातत्व विभागाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे. ६ फूट उंच आणि ४ फूट रुंद असलेली ही ग्रॅनाईट दगडातील चतुर्मुख मूर्ती दुर्मिळ आहे. मूर्ती विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहे मात्र मूर्तीची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करणे हे काम अत्यंत हळुवारपणे आणि काळजीपूर्वक करावे लागणारे आहे. हे तंत्र सामान्य शासकीय कंत्राटदाराकडे असणे शक्य नाही. त्यामुळे मूर्तीचे कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी पुरातत्व खात्याने तातडीने या कामात लक्ष घालून तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी इतिहास अभ्यासक ॲड. आनंद देशपांडे यांनी केली आहे. मंगळवेढ्याचा सांस्कृतिक वारसा जतन होणार
Source link
वारसा संवर्धन:महादेव विहिर संवर्धनासाठी 1.80 कोटी निधी मंजूर; ‘ब्रह्मदेव’ मूर्तीचे होणार जतन