Headlines

सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार:14 वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, व्यावसायिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज




सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात माथाडी नेत्याच्या अवघ्या 14 वर्षांच्या निष्पाप नातवाचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या थरारनाट्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील स्थानिक माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात मारेकरी शस्त्रांनिशी घुसले. घरात प्रवेश करताच मारेकऱ्यांनी आधी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत मारुती बंडगर (वय 14 वर्षे) हा गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांतला कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे बंडगर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त या घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलिस ठाण्याच्या पथकासह पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून संजय नगर परिसरामध्ये सध्या मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. व्यावसायिक वादातून हत्या? हा हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार व्यावसायिक वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेनंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. सोलापूर बस स्थानकातच चोरांकडून खून दुसरीकडे कोईमतूर (तमिळनाडू) येथील ज्येष्ठ नागरिक व्ही. कृष्णप्रसाद (वय 63, चेरनगर, वेल्लोर रोड, पोदनूर, कोईमतूर) यांचा सोलापूरच्या बसस्थानकात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास खून झाला. दोन चोरांनी त्यांच्या खिशातील पैसे काढून घेताना झटापट झाली. कृष्णप्रसाद यांना ढकलून दिले. ते खाली पडले. डोक्याला जबर मार लागल्यानंतर जागेवरच गतप्राण झाले. त्यानंतर चोर पसार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे चोरांना शोधून काढले. त्यात एक अल्पवयीन असल्याचे आढळून आले. कुणाल किसन कांबळे (वय 21) आणि अमन सुधाकर जेटीथोर (वय 21, दोघे रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) यांना अटक झाली. त्यांच्यावर कलम 103 अन्वये फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *