Headlines

अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:रक्तदान शिबिरांची शृंखला सुरु, गौ माता समितीचा पुढाकार‎




एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची रक्ततुला केली जाणे, ही सर्वसामान्य बाब आहे. पण रक्तदानाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहणाऱ्या अमरावतीने त्याहीपुढे जाऊन पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला करण्याचे ठरविले आहे. भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त ही रक्ततुला केली जाईल. त्यासाठी रक्तदान शिबिरांची श्रृंखला आरंभ झाली असून या शिबिरांद्वारे गोळा होणाऱ्या रक्ताच्या आधारे ही तुला केली जाईल. त्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री माहेश्वरी पंचायत, श्री गोरक्षण संस्था तसेच रामचरित मानस परिषद अशा सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून ‘गौ माता सन्मान समिती’ ची स्थापना केली आहे. या समितीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आज, गुरुवारी माध्यमांना सांगण्यात आले. यावेळी माहिती देताना सहसंयोजक तत्पूर्वी धनराज लेन येथील माहेश्वरी भवनातून भगवान श्री परशुराम व गौमातेची शोभायात्रा काढली जाईल. पुढे सक्करसाथ, जवाहर गेट, प्रभात चौक, सरोज चौक, श्याम चौक, अंबादेवी रोडने गांधी चौक असे मार्गक्रम करीत ही शोभायात्रा गोरक्षण संस्थेत पोहोचेल. त्याठिकाणी परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज व राजराजेश्वर माऊली यांच्या उपस्थितीत गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे भरविणे सुरु असून अमरावतीत १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळांत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. आर. बी. अटल, संयोजक रमेश छांगाणी, प्रचारप्रमुख संजयकुमार राठी, रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, दीपक मंत्री, नवल चांडक आदी उपस्थित होते. गौमातेच्या संवर्धनासाठी कायद्याही हवा, २७ ला आंदोलन गौमातेला सर्वोच्च स्थान देणाऱ्या या देशात गौहत्याबंदीचा कायदा अद्याप अस्तित्वात नाही. तो व्हावा, यासाठी आगामी २७ एप्रिलला आंदोलनही केले जाणार आहे. या आंदोलनाचा व समितीचा काही संबंध आहे का, असे विचारले असता या दिवशी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पैदल मार्च काढला जाणार असून सरकारच्या नावे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *