Headlines

प्रशासनाला न जुमानता करमाळ्यात बेकायदेशीर केबल खोदाईचे काम:इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली खाजगी कंपन्यांनी रस्त्याची लावली वाट‎




करमाळा तालुक्यात आतापर्यंत महानेट, जिओ, एअरटेल या कंपन्यांकडून करमाळा तालुक्यात इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व स्थानिक नेतेमंडळी व वजनदार लोकांच्या मदतीने राज्य महामार्ग ६८ सह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या साईडपट्ट्या अक्षरशः उखडून टाकल्या आहेत. सध्या दिनेश इंजिनिअर्स लिमिटेड, नेरूळ, नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा ते सालसे या रस्त्याची साईडपट्टी खोदून नियमबाह्य पद्धतीने काम सुरू आहे. या कंपनीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. रस्ते व साईडपट्टी मजबूत करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र दरवर्षी नवीन एक कंपनी येवून आमच्याकडे शासनाच्या सर्व परवानग्या आहेत, केंद्र सरकारचे काम आहे असे सांगुन स्थानिक पोट ठेकेदाराच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने खोदकाम करून रस्ते, साईडपट्टी तसेच दिशा दर्शक किलोमीटरचे मैल देखील उखडून टाकत आहेत. शासकीय सोपस्कार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून नियमबाह्य काम बंद करा अथवा गुन्हे दाखल करू अशा नोटिसा काढल्या जातात. मात्र शासनाच्या मालमत्तेचे लाखोंचे नुकसान करत महसूल, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून ही नियमबाह्य कामे सुरूच राहतात. ^संबंधित नियमबाह्य बसवलेली केबल काढून साईडपट्टीवर रोलींग करून पूर्ववत करावी. संबंधित कंपनीकडून नियमांचे पालन न झाल्यास केवळ नोटीस न बजावता सदर कंपनीवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. शंभुराजे फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख ^सध्या जेसीबीच्या साह्याने साईट पट्टी खोदण्याचे काम बंद केले असून डांबरीकरणावरील माती काढून साईड पट्टी रोलिंग करून देणार आहोत. ज्या ठिकाणी एचडीडी मशीनद्वारे केबल टाकता येत नव्हती. त्याच ठिकाणी जेसीबीच्या साह्याने चारी खोदलेली होती, ते दुरुस्त करण्याचे काम आजपासून सुरु करण्यात येणार आहे. पोट ठेकेदार, दिनेश इंजिनिअर्स लिमिटेड. ^हे काम एचडीडी मशीनद्वारे करण्याच्या सूचना असतानाही कंपनीने नियमबाह्य पद्धतीने खोदाई सुरूच ठेवली आहे. वारंवार सूचना देऊनही काम सुरूच राहिल्याने संबंधित कंपनीस आदेशाचे उल्लंघन केल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. अभिषेक पवार, उपविभागीय अभियंता या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने रस्ते किंवा जमिनीच्या वरच्या भागाचे नुकसान न करता जमिनीखालून पाइप (पाणी, गॅस) किंवा टेलिकॉम केबल्स (फायबर ऑप्टिक) टाकण्यासाठी केला जातो. यात खंदक न खोदता मशीनद्वारे जमिनीत आडवे छिद्र पाडले जाते. ज्यामुळे वाहतूक आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळता येते. खोदकाम करण्यासाठी रस्त्यांच्या मध्यभागापासून १५ मीटर अंतर सोडून खोदकाम करावे. केबल टाकण्याचे काम एचडीडी मशिनद्वारेच करावे. जेणेकरून रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. तसेच जेसीबी किंवा पोकलेनच्या माध्यमातून खोदकाम करू नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *