![]()
घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे. नाशिक शहरात छोटे, भुरटे विक्रेते बंद मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचे पार्ट खरेदी करतात. ते किलोच्या भावाने मोठ्या भंगारवाल्यांना विकतात. तिथून हा सर्व माल मुंबईच्या कामाठीपुरा येथे भरणाऱ्याचोर बाजारात पोहोचवला जातो. दर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या बाजारात मोबाइलच्या रॅम आणि मदरबोर्डची छुप्या पद्धतीने कोट्यवधींची खरेदी-विक्री सुरू असते. यातून भारतीयांचा डेटा थेट विदेशात पोहोचवला जातोय. सायबरतज्ज्ञांच्या मते, जुना मोबाइल भंगारात देताना तो ‘फॅक्टरी रिसेट’ करणे वा त्याची मेमरी चिप तोडून नष्ट करणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नसल्याने धोका वाढला आहे.
रेट कार्ड : डेटावर ठरते रॅमची किंमत मोबाइलमधील रॅम, मदरबोर्डची प्रतिकिलो 52 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत किंमत आहे. जितकी जास्त रॅम तितकी किंमत, असा साधा हिशोब असतो. हे रेट कार्डच ‘दिव्य मराठी’ने मिळवले. ज्यावर वेगवेगळ्या क्षमतेच्या रॅमच्या वेगवेगळ्या किमती दिसून आल्या. मुंबई : ग्रँट रोडवरीलचोर बाजारात पहाटे रॅमची होतेय खरेदी-विक्री प्रतिनिधी : कहाँ का माल है?
विक्रेता : देश से माल मुंबई में आता है|
प्रतिनिधी : यहाँ से आगे कहां जाता है?
विक्रेता : चीन, हाँगकाँग, बंगलोर से डिमांड है|टाइम नहीं, जल्दी बोलो नाशिक : भंगारातील मोबाइल भद्रकाली मार्केटमध्ये होतात एकत्र प्रतिनिधी : कितने पैसे मिलेंगे?
विक्रेता : चेक कर के बताता हूँ|
प्रतिनिधी : रेट कैसे तय करेंगे?
विक्रेता : मोबाइल का जीबी कितना है उससे रेट तय करेंगे|
Source link