![]()
पंढरपूर येथून म्हसवड येथील सोनारसिध्दाचे दर्शन घेवून परत पंढरपूरकडे १६ जण ए एच १३ डीक्यू ६३३५ या छोटा हत्तीमध्ये बसून येत होते. तांदुळवाडी नजीक आल्यावर विहिरीत पडून आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली असून या अपघातग्रस्त वाहनाची आरटीओ (परिवहन विभागाकडून) सोमवारी सकाळी प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी गाडीचा इन्शुरन्स २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली. या अपघात पाहणारे प्रत्यक्षदर्शी इरफान मुजावर यांच्या सांगण्यानुसार सदरची गाडी विहिरीत पडण्या अगोदर वेडीवाकडी चालत होती. यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर गजानन नेरपगार यांनी घटनास्थळ व अपघातग्रस्त गाडीची पाहणी केली. त्यांच्या या अपघातग्रस्त वाहनाची तपासणी करुन परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्याची पाहणी करत होते. यावेळी एक दुचाकीस्वार एका लहान मुलाला पुढे बसवुन मोबाइलवर बोलत दुचाकी चालवत होता. अशा प्रकारे वाहन चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे सदर दुचाकीस्वाराला थांबवुन परिवहन अधिकाऱ्यांनी त्याला समज दिली. उपस्थितीमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज अमरसिंह गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अर्चना दराडे यांनी संपूर्ण गाडीची प्राथमिक तपासणी केली. स्टेअरींग, राँडमध्ये काही दोष आहेत का हे तपासले. मोबाइलवर बोलणाऱ्या दुचाकीस्वारास समज
Source link
अपघातग्रस्त छोटा हत्तीचा नाही इन्शुरन्स:तांदूळवाडीतील विहिरीत पडलेले वाहन तांत्रिक बिघाड मुक्त