Headlines

अधिकमासात तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलोवर सोने, 20 किलो चांदी:दानपेटीत भाविकांनी घातली 6 कोटी 85 लाख रुपयांची भर



पवित्र अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान आले आहे. अधिकमासात तुळजाभवानीचरणी तब्बल ८४१ ग्रॅम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभवानी मातेचा दानपेटीत तब्बल ६ कोटी ८५ लाख रुपयांची भर

.

दर तीन वर्षांनी येणारा हिंदू धर्मातील पवित्र अधिक मास १७ मे १४ जून या कालावधीत साजरा करण्यात आला. अधिकमासात देवदर्शन व दानधर्माला विशेष स्थान आहे. अधिकमासात कुलदैवतांचे दर्शन शुभ मानले जाते. या वर्षीचा अधिकमासात भाविकांनी तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान टाकले आहे. अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत तब्बल ०६ कोटी ८५ लाख ५९ हजार ८४६ रूपयांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक सशुल्क दर्शनचा माध्यमातून २ कोटी ८८ लाख रुपयांची भर पडली आहे.

दररोज लाखावर भाविक तुळजाभवानी चरणी

या वेळी अधिक मास उन्हाळ्याचा सुट्यात आल्याने भाविकांचा गर्दीत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. अनेकांनी सुट्यात धार्मिक पर्यटनावर भर देत त्या अनुषंगाने प्लॅनिंग केले. परिणामी या वर्षी उन्हाळ्यात भाविकांचा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद केली. दररोज सरासरी लाखावर भाविकांनी तुळजाभवानीचरणी माथा टेकवल्याचे सांगण्यात येत आहे.

सशुल्क दर्शनातून मिळाले २ कोटी ८८ लाख रुपये

  • सोनेसदृश वस्तू- ८४१ ग्रॅम ७६० मी. ग्रॅम चांदी – १९ किलो ८०० ग्रॅम ६७० मी. ग्रॅम ● दानपेटीत तब्बल पावणेसात कोटींची भर सशुल्क दर्शन – २ कोटी ८८ लाख रुपये
  • सिंहासन पेटी – १ कोटी २८ लाख
  • ऑनलाइन देणगी दर्शन – १ कोटी २२ लाख रुपये दानपेटी – ४२ लाख ८१ हजार एकूण – ६ कोटी ८५ लाख रु.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *