![]()
तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास्
.
चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि आतले मौल्यवान तांबे व इतर धातू काढून घेऊन पोबारा केला. बाजारात तांब्याला मोठा भाव मिळत असल्याने हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तिसगाव धरण क्षेत्र परिसरातील तिसगाव, शिंदवड, खेडगाव, सोनजांब, तळेगाव, मावडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या या केबल होत्या.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली.
यावर्षी पावसाळा लांबल्याने आणि तिसगाव धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने शेतकऱ्यांना धरणाच्या आत खोलवर मोटारी टाकाव्या लागल्या आहेत. पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेकडो मीटर लांबीच्या केबल्स् टाकल्या होत्या. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा चोरांनी घेतला. चोरट्यांनी १ जून रोजी तब्बल २०० केबल्स् एकाच रात्रीत गायब केल्या. त्यानंतर १४ जून रोजी २० आणि १५ जून रोजी एकाच रात्रीत ८० केबल्स् चोरून नेत १५ दिवसांत ३०० हून अधिक केबल्स्चा आकडा पार केला आहे.
^आर्थिक संकटाशी झुंज देत असतानाच या केबल चोरीमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. वणी पोलिस आणि महावितरण प्रशासनाने तातडीने या टोळीचा शोध घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. – प्रवीण बस्ते, शेतकरी नेते, शिंदवड
^गुन्हा दाखल केला असून, त्याप्रमाणे तपास सुरू आहे. मोबाईल लोकेशन शोधत आहोत, गतवेळी काही महिला व एका ज्येष्ठ नागरिकांचा नंबर ट्रॅक झाला, पण त्याचा या घटनेशी काही संबंध नाही. काही स्थानिक व्यापारी व गावोगाव फिरणाऱ्या भंगार गोळा करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. – गायत्री जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वणी.