![]()
राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा कसही लागेल. महायुतीचे हे 6 उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. सत्ताधारी महायुतीने ‘मास्टरस्ट्रोक’ लगावत 6 जागा बिनविरोध जिंकून ‘बूस्टर डोस’ मिळवला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढाई रंगणार असून, 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत नेमका कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला गुलाल लागणार, याचे चित्र स्पष्ट होईल. बिनविरोध विजयी उमेदवार.. आमने-सामने कोण ? या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स पहा.…
Source link
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान:22 जूनला निकाल; संभाजीनगरमध्ये व्हीलचेअरअभावी गोंधळ, नगरसेविकेला खुर्चीवरून आणल्याने राडा