![]()
नागपूर येथील धर्मांतर प्रकरणात फरार असलेला तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमुद मकसद याला अटक करण्यात आली आहे. हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितेचा बळजबरीने निकाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली. या गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यापासून मौलाना फरार होता. पोलिसांचे एक विशेष पथक मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि तामिया परिसरात त्याचा शोध घेत होते. पोलीस आपल्या मागावर असल्याचे आणि अटक अटळ असल्याचे समजताच, अटकेच्या भीतीने अखेर तो नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात स्वतःहून शरण आला. बुधवारी (१७ जून) उशिरा रात्री पोलिसांनी त्याला अधिकृतपणे अटक केली असून, सक्तीच्या धर्मांतर रॅकेटमध्ये त्याचा आणखी काही सहभाग आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. यापूर्वी ३१ मे २०२५ रोजी मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे याने पीडितेला मध्य प्रदेशातील तामिया येथे नेऊन, एका अंधाऱ्या खोलीत मौलानाच्या उपस्थितीत बळजबरीने तिचा निकाह लावून दिला होता. तसेच, तिथे तिला सक्तीने गोमांस खाऊ घातले होते. वडिलांची भीती आणि पती संसार मोडण्याची धास्ती यामुळे वर्षभर गप्प बसलेल्या पीडितेने अखेर सोनेगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे आणि त्याचा साथीदार आमीर शेख या दोघांना यापूर्वीच अटक केली आहे.
Source link
नागपूर धर्मांतर प्रकरण:फरार मौलानाला अटक, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली