Headlines

घरोघरी जिजाऊ घडल्याशिवाय "शिवबा' घडणार नाहीत:पिचडगावच्या सुदर्शन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका अंजना सोनवणे यांचे आवाहन‎




प्रतिनिधी | नेवासे फाटा आजच्या काळात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलांना जिजाऊ माँसाहेबांसारखे ज्ञान व संस्कार देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षिका अंजना सोनवणे यांनी केले. नेवासे तालुक्यातील पिचडगाव येथील सुदर्शन न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सोनवणे म्हणाल्या, अखंड हिंदुस्थानात स्वराज्य स्थापन व्हावे, या उद्देशाने राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयातच स्वातंत्र्याचे आणि पराक्रमाचे धडे दिले. त्यांच्याच संस्कारांमुळे शिवरायांनी जिद्दीने मावळ्यांना सोबतीला घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले. आजची मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी, विशेषतः मातांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून मोठ्यांचा आदर, शिक्षणाची जिद्द आणि गुरूंविषयी आदर बाळगण्याचे संस्कार दिले पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कर्जुले यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश कचरे यांनी केले. मुख्याध्यापक शकूर इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *