Headlines

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बदल्यानंतर आता विभाग बदलीच्या हालचाली:सीईओ विवेक गायकवाड यांचा निर्णय




हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आता विभाग बदलीच्या हालचाली सुरू झाले असून याबाबत तातडीने आवश्यक माहिती सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहे. पुढील आठवड्यामध्ये विभाग बदली होणार असल्याची चित्र आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमधून कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यात बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करून रिक्त जागांची माहिती घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्या उपस्थितीत या बदल्या करण्यात आल्या. समुपदेशन पद्धतीने करण्यात आलेल्या या बदल्यामुळे कर्मचाऱ्यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये गतिमानता आली आहे. दरम्यान त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी विभाग बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच विभागामध्ये मागील पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी विभाग बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने देखील या कर्मचाऱ्यांची माहिती तयार करण्यास सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यामध्ये विभाग बदलीची कार्यवाही पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय विभाग बदलीनंतर कर्मचाऱ्यांची टेबल बदली देखील केली जाणार आहे. एका विभागामध्ये तीन वर्षात पासून एका टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची टेबल बदली केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व विभाग पुन्हा एकदा विभाग कर्मचाऱ्यांच्या विभाग बदलीने ढवळून निघणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *