Headlines

आरडीजी होम लीगचा समारोप:मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण; युवराज सोळंके बेस्ट प्लेअर‎




येथील आरडीजी बास्केटबॉल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘होम लीग सीझन-११” बास्केटबॉल स्पर्धेचा तीन दिवसांच्या थरारक व रोमांचक सामन्यांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत अकोल्यातील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, अफाट जिद्द आणि उच्च क्रीडाभावना दाखवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बिडवे, विजय मालोकार, वरिष्ठ बास्केटबॉल खेळाडू शरद कोकाटे, आशिष बेलोकार आणि भूषण पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सुमित यादव, यश पाल, आदित्य आवारे, नौशाद शेख आणि करण यादव यांनी स्पर्धेचे अचूक नियोजन, व्यवस्थापन आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडली. पब्लिक स्कूलचे चेअरमन दिलीप राज गोयंका, प्राचार्य कुरीचन सर, उपप्राचार्या श्वेता चूमवाल, नितीन श्रीगावकर आणि अक्षय गिराम यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. स्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांचा विशेष गौरव १. बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: रॅप्टर्स संघाच्या युवराज सोळंके याने स्पर्धेत तब्बल १५० गुणांची नेत्रदीपक नोंद करत हा मानाचा किताब पटकावला. २. बेस्ट शूटर ऑफ द टूर्नामेंट: फिनिक्स संघाच्या विराज म्हाळ्ले याने आपल्या अचूक निशाण्यासह १२० गुण नोंदवून हा पुरस्कार मिळवला. त्याला बास्केटबॉल प्रदान करण्यात आला. ३. बेस्ट डिफेंडर ऑफ द टूर्नामेंट: स्ट्रायकर्स संघाच्या सक्षम गायकवाड याला त्याच्या प्रभावी व भक्कम बचावात्मक खेळासाठी सन्मानित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *