![]()
मोर्शी येथे जागतिक योग दिनानिमित्त डॉ. श्रीराव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तदाता संघाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तहसीलदार सागर ढवळे, दिव्यांग विजय कोकरे (अंबाडा), संदीप पोतदार आणि ऋषिकेश विघे यांनी रक्तदान करून शिबिराचा प्रारंभ केला. या शिबिरात विभाताई चौबे, महेक हरवानी, भाग्यश्री यावुल, उज्वला पाथरे आणि कांचन दंडाळे या महिलांनीही रक्तदान केले. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत असून, अनेकदा रुग्णांना रक्ताची तातडीने गरज भासते. शस्त्रक्रियेदरम्यानही रक्ताची उपलब्धता महत्त्वाची ठरते. सध्या जिल्ह्यात रक्तदान शिबिरे कमी होत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, ज्यामुळे वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या गंभीर समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आणि एका रक्तदानामुळे एखाद्याला नवजीवन मिळू शकते, ही भावना लक्षात घेऊन डॉ. सागर श्रीराव आणि डॉ. ऋतुजा श्रीराव यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या शिबिराचे आयोजन केले होते. रक्त संकलनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रफुल्ल पेदाम, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, जयवंत गावंडे, रश्मी मुळे, प्रवीण कळस्कर तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील सुजित वानखेडे, कांचन राऊत, अक्रम सौदागर, नागोराव खडसे, योगेश महाजन, कविता इंगोले आणि निलेश शेंद्रे उपस्थित होते. यावेळी श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे राज्य संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. मोर्शी रक्तदाता संघाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद पोतदार, कार्याध्यक्ष तथा जयदेवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मिलिंद ढोले, सचिव गजानन हिरुळकर आणि सहसचिव अजय पाटील यांचीही उपस्थिती होती. या रक्तदान शिबिराला नगरसेविका सुनिताताई कोहळे, सुनील कोहळे, निखिल ओझा, न्यू जनरेशन केअर फाउंडेशनचे अध्यक्ष नवीनकुमार पेठे, प्रणित यावलीकर, अक्षयकुमार राऊत, नितीन ढोले, अजिस पठाण, प्रा. संदीप राऊत, काँग्रेसचे मोर्शी वरुड विधानसभा अध्यक्ष श्रणित राऊत, मनोज लोहकरे, पवन जांभोळे, डॉ. योगेश पोके, नरेंद्र गोहाड, नरेंद्र निकम, दिनेश मिश्रा, विजय शिरभाते, शुभांगी शिरभाते आणि तेजल शिरभाते आदींनी भेट दिली.
Source link
मोर्शीत जागतिक योग दिनी 101 जणांचे रक्तदान:डॉ. श्रीराव हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तदाता संघाचा उपक्रम