Headlines

समन्सला दांडी मारणे पडले महाग:21 अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक




विविध गुन्ह्यांत न्यायालयाने वारंवार समन्स आणि वॉरंट बजावूनही साक्षीसाठी हजर न राहणाऱ्या आरोपी आणि साक्षीदारांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांनी मोहीम उघडली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या २१ फरार व प्रलंबित आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. या अटक केलेल्या आरोपींची न्यायालयाने थेट येरवडा आणि इतर विविध कारागृहात रवानगी केली आहे. श्रीगोंदे, बारामती, जुन्नर आणि दौंड येथील न्यायालयांनी साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र, तरीही हे आरोपी, साक्षीदार आणि फिर्यादी न्यायालयात हजर झाले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पोलीस ठाण्यात एकूण ३५९ एन.बी.डब्ल्यू. वॉरंट प्रलंबित होते, ज्यापैकी पहिल्या टप्प्यात २१ आरोपींना जेरबंद करून न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: मुनाफ गुलाम हुसेन कुरेशी (श्रीगोंदे) – सेशन कोर्ट श्रीगोंदे, संतोष आनंदा शिंदे (बेलवंडी स्टेशन) – सह दिवाणी कोर्ट अहिल्यानगर, पोपट पर्वती होले (फुलेवाडी) – अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, सोल्या काळकुशा काळे, कमल सोल्या काळे, चंदा सोल्या काळे (बानगाव) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, छाया भाऊसाहेब मखरे (मखरेवाडी) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, गोरख बबन राऊत (शेडगाव) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जुन्नर (पुणे), मुक्तार मनोद्दीन काजी व आसिफ शमशुद्दीन तांडेल (पेडगाव) – सेशन कोर्ट श्रीगोंदे, सोमनाथ महादेव गिरमकर (अजनुज) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, दीपक चंद्रकांत दांगट (काष्टी) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, अशोक संपत बर्डे (भिंगाण) – सेशन कोर्ट बारामती, शोएब अल्ताफ शेख (इंदिरानगर) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, अभिषेक बाळासाहेब होले (औटेवाडी) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, शुभम बाळासाहेब पाचपुते (काष्टी) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, विठ्ठल मच्छिंद्र दांगडे (देऊळगाव) – अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीगोंदे, शिवाजी शंकर राऊत (राऊत मळा) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे, अनिल जयसिंग घनवट (श्रीगोंदे कारखाना) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दौंड (पुणे), राजू भाऊसाहेब ससाने (हिरडगाव) – अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीगोंदे, मंडाबाई सख्या पवार (काष्टी‌) – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदे. न्यायालयाने काढलेल्या समन्स किंवा वॉरंटला हलक्यात घेऊ नका. दिलेल्या तारीख व वेळेत सन्माननीय न्यायालयात स्वतः हजर राहावे. जेणेकरून पोलिसांकडून अचानक होणाऱ्या अटकेची नामुष्की टाळता येईल आणि जेलवारी करण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *