Headlines

दिल्लीत 11 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार, नंतर हत्या:झोपेत असताना उचलून घेऊन गेला होता टॅक्सी चालक, मुलगी फुगे विकायची




दिल्लीत फुगे विकणाऱ्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी फुटपाथवर झोपलेल्या मुलीचे टॅक्सी चालकाने अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेह मेहरौलीच्या जंगलात फेकून दिला होता. सोमवारी सकाळी सुमारे 6 वाजता कुटुंबीयांनी पीसीआर कॉलद्वारे मेहरौली पोलिस ठाण्यात मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने चार तासांतच बबलू नावाच्या टॅक्सी चालक आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या माहितीवरून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. मुलगी फुगे विकायची आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, रस्त्याने जात असताना त्याने सीडीआर चौकाजवळ फुटपाथवर मुलीला झोपलेले पाहिले. त्याने झोपेतच मुलीला उचलले आणि गाडीच्या मागच्या सीटवर झोपवून मेहरौलीच्या जंगलात घेऊन गेला, जिथे त्याने गुन्ह्याला अंजाम दिला. पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंब फुटपाथवरच झोपायचे. मुलगी फुगे विकायची, तर आई-वडील रोजंदारीवर काम करतात. कुटुंबात चार मुले आहेत, ज्यात ही 10 वर्षांची मुलगी देखील होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *