Headlines

मतदार यादीतून नावे वगळू नका:छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना आढावा बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या सूचना




खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणादरम्यान आपल्या हक्काच्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुका आणि विधानसभा पातळीवरील कार्यकर्त्यांनी यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, विलास भुमरे, संजना जाधव, प्रदीप जैस्वाल, संपर्कप्रमुख विलास पारकर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. शिंदे यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला. विधानसभेत पक्षाला मोठे यश मिळाले, तसेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कमी जागा लढवून चांगले यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरावर यश मिळाले असले तरी, ज्या ठिकाणी अपयश आले, त्या अपयशांच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आगामी तीन वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्यामुळे, पराभवांच्या कारणांचा सखोल अभ्यास करून संघटना अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. हे केवळ भाषण नसून, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि संघटनात्मक समस्यांची माहिती घेण्यासाठी वन-टू-वन चर्चा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *