![]()
पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा लागतोच आहे ना? जर आपल्याला ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा घेऊन पुढे चालायचे असेल, तर पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन, तीन वर्षे आमदारकी पचवून त्यांच्यावरच गरळ ओकणारे लोक आता नको आहेत, अशा अत्यंत कडक शब्दांत माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी विरोधकांना सुनावले. त्यांच्या या विधानाचा रोख थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, आता बीड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप आणण्याची पूर्ण तयारी झाली आहे. यापुढे कार्यकर्त्यांना कोणाकडे गार्हाणे मांडण्याची किंवा तक्रार करण्याची संधीच मिळू नये, यासाठी या भागातून केवळ आणि केवळ ‘आपला माणूस’ निवडून आला पाहिजे. तो निवडून आणायचा असेल तर त्याची पूर्वतयारी आपल्याला आतापासूनच करावी लागणार आहे. आधी आपण आपला मतदारसंघ मजबूत तयार करू, मग जेव्हा आपल्या मनासारखे घडेल, त्यावेळी आपल्याला आपला हक्काचा उमेदवार सहज निवडून आणता येईल. ..बोगस मतदार यादीतून उडवणार मतदार यादीतील फेरबदलांवर बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात ‘एसआयआर’ मध्ये आपल्या मताशी प्रामाणिक असणारेच मतदार यादीत राहतील आणि बोगस मतदारांची नावे शोधून त्या यादीतून उडवली जातील, यासाठी आपण विशेष मोहीम राबवून काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. बीड जिल्हा मीच पाहणार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, यापूर्वी 12 वर्षे मीच तुमचे काम पाहिले. या पुढे सुद्धा मीच बीड पाहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळात तुमच्या हक्कासाठी मी खंबीरपणे उभी राहीन आणि तुमच्या सर्व तक्रारी व प्रश्न सोडवले जातील. ..तर ताकदी निशी रस्त्यावर उतरू कुठल्या संस्थेशी आणि राजकारणाशी संबंध नसताना सरळ साधा माणूस असलेल्या विलास घुले या हॉटेल चालक तरुणाची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जर तपास यंत्रणा योग्य तपास करीत नसेल आपण पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिला. केज तालुक्यातील टाकळी येथे स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांत्वन केले.
Source link
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलू शकतं, तर बीडमध्ये का नाही?:गरळ ओकणारे लोक नकोत, आता 'शतप्रतिशत भाजप' हवा- प्रीतम मुंडे