![]()
भरधाव वेगात जाणाऱ्या पार्सल वाहतूक ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात नवी मुंबईतील प्रा. डॉ. वंदना निकुंभ (५८) या ठार झाल्या. दुचाकी चालवणारे त्यांचे चुलत भाऊ श्रीकांत निकुंभ बचावले. रविवारी रात्री १०.३० वा. हा अपघात टाकळी रोडवरील माजी महापौर दिवे यांच्या निवासस्थानासमोर घडला. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. वंदना भास्कर निकुंभ (५८ रा. दीपांजली बंगला, शिवाजीनगर, पुणेरोड) या भावाच्या दुचाकीने (एमएच १५ जीएच २२१८) शिवाजीनगरला घरी जात असतांना पार्सल वाहतूक करणारा ट्रक (टीजी १२ यू. ४९१०) ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात डाॅ. निकुंभ रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या. ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळावरून चालक ट्रक सोडून फरार झाला. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शिवाजीनगरातील आपल्या घरी जातांना काळाचा घाला
एका कार्यक्रमासाठी नाशिकला आलेल्या डाॅ. निकुंभ या भावासोबत दुचाकीने शिवाजीनगरातील आपल्या घराकडे त्या जात होत्या. ट्रकच्या धडकेत त्या डाव्या बाजूला पडल्या व ट्रकच्या चाकाखाली आल्या. तर भाऊ दुचाकीसह उजव्या बाजूला पडल्याने वाचला. डोळ्यादेखत चुलत बहिणीचा असा भीषण अपघात झाल्याने श्रीकांत निकुंभ यांना प्रचंड धक्का बसला. घराकडे जातानाच काळाने घाला घातला.
Source link
भावाच्या डोळ्यासमोरच डॉक्टर बहिणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू:शिवाजीनगरातील आपल्या घरी जातांना काळाचा घाला