Headlines

पेपरफुटीवरून विरोधकांचे प्रश्न अन् सरकारची परीक्षा:टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे




महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले. देशाच्या नोटा छापण्यासाठी नाशिकची निवड केली जाते, मग महाराष्ट्रातील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका छापायला आग्रा कशाला हवा? असा घरचा आहेर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या गुन्ह्यातून स्पष्ट झाले की यात कोणताही महाराष्ट्रीयन माणूस नसून सर्व बाहेरचे आहेत. तिजोरीला टाळेच लावायचे नसेल तर चोरी होणारच. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *