Headlines

सचिन अहिरांच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटात खळबळ:वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते, आमदार सुनील शिंदेंचा घरचा आहेर




सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत थेट महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खंदे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिरांच्या या अनपेक्षित खेळीवर आता ठाकरे गटातूनच अत्यंत तीव्र आणि धक्कादायक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी या सर्व प्रकरणावर थेट भाष्य करताना आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. सचिन अहिर यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करताना आमदार सुनील शिंदे यांनी थेट पक्षनेतृत्वालाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकरणात आत्मपरीक्षण करायला हवे होते. सचिन अहिर यांचे गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीचे वागणे आणि हालचाली सुरू होत्या, त्यावरून ते काहीतरी वेगळा निर्णय घेणार याची मला आधीच स्पष्ट कल्पना आली होती. परंतु, मी पक्षात एक छोटा कार्यकर्ता असल्यामुळे या गंभीर विषयावर वरिष्ठांकडे भाष्य करू शकलो नाही किंवा मला बोलता आले नाही.” पवारांच्या किचन कॅबिनेटमधील नेते आमचे कसे होणार? सचिन अहिर यांच्या भूतकाळातील राजकीय प्रवासाचा हवाला देत सुनील शिंदेंनी त्यांच्या निष्ठेवर जोरदार प्रहार केला. “सचिन अहिर हे ओरिजिनल आमच्या पक्षातील नव्हतेच. पूर्वी त्यांना शरद पवार यांच्या ‘किचन कॅबिनेट’मधील अत्यंत जवळचे नेते म्हणून संबोधले जायचे. जे व्यक्ती शरद पवारांसारख्या नेत्याचे सख्खे होऊ शकले नाहीत, ते आमच्या पक्षाशी कसे काय एकनिष्ठ राहू शकतात?” असा तिखट सवाल शिंदेंनी उपस्थित केला. अब्दुल सत्तारांचा सचिन अहिरांबाबत मोठा गौप्यस्फोट एकीकडे ठाकरे गटात अस्वस्थता असताना, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी एका खळबळजनक माहितीचा खुलासा केला आहे. अब्दुलल सत्तार यांच्या दाव्यानुसार, सचिन अहिर हे उपसभापतीपदासाठी अचानक शिंदे गटात आलेले नाहीत, तर ते आधीपासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. अब्दुल सत्तार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे जे खासदार फुटले, त्या संपूर्ण प्रक्रियेत सचिन अहिर हे वरवर उद्धव ठाकरेंसोबत दिसत असले, तरी पडद्यामागून ते एकनाथ शिंदेंचेच काम करत होते. त्यांनी त्यावेळी केलेल्या याच मदतीचे ‘बक्षीस’ म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांना आता विधानपरिषदेचे उपसभापतीपद दिले आहे.” ठाकरेंचे आणखी १२ आमदार फुटणार सचिन अहिर यांच्या प्रवेशावरच न थांबता, अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाच्या भविष्याबाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. “आगामी काळात ठाकरे गटाला आणखी धक्के बसतील. त्यांचे तब्बल १२ पेक्षा जास्त आमदार लवकरच आमच्या पक्षात प्रवेश करतील,” असा खळबळजनक दावा सत्तार यांनी केल्याने आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आगामी घडामोडींकडे लागले आहे. हे ही वाचा… एकट्याने पक्ष सोडूनही सचिन अहिर एकदम सेफ!:अपात्रतेची कारवाई होणार नाही; जाणून घ्या कायदेशीर बाजू, असीम सरोदे यांनी सांगितले कारण ‘मी शिवसेना सोडलेलीच नाही’:पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढण्यावरही दिले सूचक उत्तर ‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’:सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही साधला थेट निशाणा ‘ऑपरेशन टायगर’ नव्हे, ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’:सचिन अहिरांच्या जाण्यानंतर आदित्य ठाकरेंचा थेट आरोप, ‘अजून किती ओरबडणार?’ ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी ‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरू:3 नावं चर्चेत ठेवून शिंदेंनी फोडला ठाकरेंचा विश्वासू मोहरा; सचिन अहिर शिंदे गटात, जाणून घ्या इनसाइड स्टोरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *