Headlines

अजित पवारांच्या विमान अपघातामागे गूढ उपकरणाचा संशय- रोहित पवार:सीआयडी तपास संथ असल्याचा आरोप, व्हीएसआरवरही ताशेरे




राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक विधान केले आहे. हा अपघात नैसर्गिक नसून एका विशिष्ट उपकरणाद्वारे घडवून आणला गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांच्या दाव्यानुसार, एका मराठी उद्योजकाकडे असे अत्याधुनिक उपकरण आहे, ज्याद्वारे विमानाच्या मार्गात अडथळा निर्माण करून ते पाडणे शक्य आहे. या गंभीर तांत्रिक बाबीची दखल घेत, केंद्र सरकारच्या संरक्षण समितीवर असलेले पार्थ पवार यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी आणि विमानांच्या सुरक्षेबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अपघाताच्या चौकशीबाबत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. सीआयडी तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत, त्यांनी या संपूर्ण प्रकरणात ‘व्हीएसआर’ कंपनीची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. अपघाताशी संबंधित ५० पुरावे लवकरच सादर करणार या अपघाताशी संबंधित आपल्याकडे १०० पुरावे आहेत, त्यापैकी ५० पुरावे आतापर्यंत समोर आले आहेत. उर्वरित ५० पुरावे लवकरच पुढील पत्रकार परिषदेत मांडले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *