Headlines

पुण्यात चोरी:ब्लिंकिटच्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 4 जणांवर गुन्हा




पुण्यातील सोमवार पेठ येथील ऑनलाइन डिलिव्हरी कंपनी ‘ब्लिंकिट’च्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पुणे पोलिसांनी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्र पाटोले, लॉरेन्स नवगिरे (वय २२), गगनदीप सिंग (वय २३) आणि अथर्व जाधव (वय २३) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी याच गोदामात कार्यरत होते. याप्रकरणी तक्रारदार विक्रम प्रभाकर भालेराव (वय ४७) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, १० जून ते २६ जून २०२६ या कालावधीत गोदाम तात्पुरते बंद असल्याचा गैरफायदा घेत या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चोरी केली. आरोपींनी गोदामातून पॉवर बँक, महागडे एअरबड्स आणि इयरफोन असे एकूण २९ हजार ३६६ रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेले. काही दिवसांनी साहित्याची तपासणी करताना वस्तू कमी आढळल्याने गोदामातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे हे कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून ताब्यात घेतले असून, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. मैत्रिणीशी झालेल्या वादातून आई, चुलतभावावर हल्ला मैत्रिणीशी झालेल्या वादातून टोळक्याने तरुणीसह तिची आई, चुलतभावावर हल्ला केल्याची घटना खडकी परिसरारात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अनिकेत चांदणे, सागर चांदणे, आकाश चांदणे, यश गोपनारायण, सलमान शेख, नकुल गायकवाड, राहुल विघ्नेश्वर, कुबेर लखन, राज उर्फ बाब्या सोनार, अनिकेत पठारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खडकीतील हे महादेववाडीत राहायला आहेत. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी चांदणे हे ओळखीचे आहेत. तरुणीचा आरोपीशी वाद झाला होता. त्यानंतर २९ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणीच्या घरासमोर आले. त्यांनी तरुणीच्या घरासमोर दहशत माजविली. फिर्यादी यांची मुलगी, तिची आई आणि चुलतभावाला मारहाण केली. त्यांना बादलीने मारहाण केली. तरुणीच्या चुलतभावाच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक एस. पटेल तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *