Headlines

पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा झाला गौरव:राज्य, जिल्हा, तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान‎




बार्शी तालुका कृषी विभाग व बार्शी पंचायत समिती कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी बार्शी पंचायत समिती येथे कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कृषी दिन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती बार्शीचे उपसभापती संतोष निंबाळकर, खडकलगावचे माजी सरपंच दीपक रोंगे, बार्शी बाजार समितीचे माजी संचालक वालचंद मुंडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद वाघमोडे, पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी, शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सर्व शेतकऱ्यांचा कृषी दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. राजकुमार शिंदे यांनी आपत्कालीन सोयाबीन पीक व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. या शेतकऱ्यांचा सन्मान (उडीद पीक – सर्वसाधारण गट) प्रथम क्रमांक उमाकांत भोईटे, द्वितीय अमितकुमार खटोड, तृतीय बाळासाहेब धुमाळ (खांडवी). (उडीद पीक – आदिवासी गट) प्रथम क्रमांक नंदकुमार पवार. (तूर पीक – सर्वसाधारण गट) प्रथम क्रमांक विनोद धुमाळ, तृतीय श्रद्धा अवताडे. (उडीद पीक – सर्वसाधारण गट) प्रथम क्रमांक रंगनाथ ठाकरे. (सोयाबीन पीक) प्रथम क्रमांक योगीराज गव्हाणे, द्वितीय नागेश बगले, तृतीय उर्मिला ठाकरे. (सोयाबीन सर्वसाधारण गट) प्रथम क्रमांक अश्रुबा जाधवर (चुंब), द्वितीय दत्तात्रय जाधव (उंबर्गे). (मका पीक) प्रथम क्रमांक रमेश पाटील (उपळाई ठोंगे). (उडीद पीक – सर्वसाधारण गट) प्रथम क्रमांक हनुमंत जाधव (सौंदरे), द्वितीय शितल जाधव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *