![]()
जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ऑपरेशन ड्रॉप केस मोहिमेत मुक्ताईनगर तालुक्यात यशस्वी कारवाई करत ५८ लाख ४२ हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीबद्दल प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेने पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व सहकाऱ्यांचा विशेष सत्कार केला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तालुक्यातील कुऱ्हा, लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये धाडसत्र राबवले. या कारवाईत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, शस्त्रे, जीवंत काडतुसे, मोबाइल, चारचाकी व दुचाकी वाहने, वन्य प्राण्यांचे कातडे हस्तगत करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस दलाच्या या कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, जिल्हा संघटक मोतीलाल जोगी, तालुकाध्यक्ष हकीम चौधरी, तालुका सचिव विजय खराटे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे आणि जिल्हा सदस्य बी. डी. गवई यांच्यासह समाधान पाटील, राजकुमार जैन, सुपडू बोदडे, जगदेव इंगळे, धनंजय सापधरे, भारती लोखंडे हजर होते.
Source link
‘ऑपरेशन ड्रॉप केस’ फत्ते, मुक्ताईनगरात पोलिसांचा सामाजिक संघटनांकडून गौरव