Headlines

Yogesh Kadam Hits Back at Raj Thackeray Over Public Connect


केवळ व्यासपीठावरून भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, तर त्यासाठी जनतेमध्ये उतरून काम करावे लागते. महायुती सरकार म्हणून आम्ही ते काम करत आहोत आणि म्हणूनच लोकसभा, विधानसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आहे,

.

राज ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’ करणाऱ्यांशी केल्याबद्दल योगेश कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. अशा शब्दांत लोकप्रतिनिधींची तुलना करणे अत्यंत अयोग्य आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते, तेव्हा राज ठाकरेंचे या देहविक्रीच्या व्याख्येवर काय मत होते? हे त्यांनी स्पष्ट करावे, असा खोचक सवाल कदम यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरेंची निवड

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आत्मचिंतनाच्या सल्ल्याला उत्तर देताना मंत्री कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निशाणा साधला. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरेंची नेते म्हणून निवड करण्यात आली, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचार व्हायला हवा होता. उद्धव ठाकरे नेते झाल्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांनी पक्ष सोडला आणि शेवटी एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक उठाव केला. त्यामुळे संजय राऊत यांनी इतर पक्षांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे आत्मचिंतन करावे, असा घणाघात त्यांनी केला.

सोशल मीडियावरील शिवराळ भाषेला चाप बसणार

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि टार्गेट करण्याच्या प्रवृत्तीवर सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली जाते. ठराविक लोकांना टार्गेट केले जाते. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक कडक कायदा आणण्याच्या विचारात आहे.

संबंधित बातमी वाचा…

राज ठाकरेंची अमित शहांवर टीका:म्हणाले- महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या आणि घाणेरड्या राजकारणाला शहांचीच रणनीती जबाबदार

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.