![]()
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दोन अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच, लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. ‘रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदारांना का नाही?’ काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून सलग दुसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने सभागृहात खळबळ उडाली. विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले, “जर चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना २५ सुरक्षारक्षक दिले जाऊ शकतात, तर जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना तशीच सुरक्षा का दिली जात नाही?” या प्रकरणाची सखोल चौकशी करून पठाण यांना तत्काळ अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असून धोका लक्षात घेऊन आवश्यक ते संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांचा ‘सभात्याग’ एकीकडे आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा तापलेला असतानाच, दुसरीकडे अधिवेशन सुरू असताना लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर विषयावर तातडीने चर्चा व्हावी, यासाठी विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे आग्रही मागणी केली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढते आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. अखेर, शेतकरी आत्महत्यांसारखा अत्यंत प्राधान्याचा विषय असतानाही अध्यक्षांनी यावर चर्चा नाकारल्याचा निषेध करत, विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहातून थेट ‘सभात्याग’ केला. हेही वाचा.. शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी गौणखनिज रॉयल्टीमुक्त; ट्रॅक्टरवर कारवाई होणार नाही राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी शेतीसंबंधित कामांसाठी जे गौणखनिज (मुरूम, वाळू, दगड, माती) वापरतात, ते आता पूर्णपणे ‘रॉयल्टीमुक्त’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. सविस्तर वाचा चंद्रपुरातील धक्कादायक घटना:नवजात बाळ विक्रीप्रकरणी भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; दोघीही आमदार जोरगेवारांच्या समर्थक असल्याची चर्चा पैशांच्या हव्यासापोटी एका जन्मदात्या मातेनेच आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली होती. आता या मानवी तस्करी आणि बाळ विक्री प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. बुधवारी या दोन्ही महिलांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत केली आहे. या कारवाईमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा
Source link
सुरक्षेवरून विधानसभेत राडा:बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार संतापले; म्हणाले- रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदाराला का नाही?