![]()
छत्रपती संभाजीनगर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे वेगाने घडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संयमित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वागणुकीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा. त्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. सामाजिक कार्य तसेच राज्यसभेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनच्या वतीने डॉ. फौजिया खान यांचा मौलाना आझाद संशोधन सभागृहात सत्कार करण्यात आला. या वेळी बीसीयूडीचे माजी संचालक डॉ. ए. जी. खान, जामिया इस्लामिया काशिफूल उलूमचे अध्यक्ष हाजी अब्दुल जब्बार, एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, हसीन अख्तर, डॉ. मकदुम फारुकी आदींची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना डॉ. खान म्हणाल्या, राज्यसभेच्या सदस्य म्हणून विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र सरकारच्या सहकार्याने मराठवाड्यात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. “बिफोर करोना मेमरीज फेड’ पुस्तकाचे प्रकाशन या वेळी कोरोनाकाळात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद असलेले सय्यद रिजवानउल्लाह लिखित बिफोर करोना मेमरीज फेड या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी खालिद सैफुद्दीन, मोहंमद वासिल, डॉ. इरफान रऊफ आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा- डॉ. खान:मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनतर्फे जाहीर सत्कार