Headlines

देशी बियाण्यांचे जतन, फूड फॉरेस्टची उभारणी, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला‎:कुऱ्हा परिसरातील युवा शेतकरी निखिल तेटू यांना कृषी भूषण पुरस्काराने केले सन्मानित



हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी व कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार सोहळ्यात तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील युवा शेतकरी निखिल मधुकर तेटू यांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित कर

.

पुरस्कार वितरण समारंभाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मृद व जलसंधारण मंत्री इंद्रनील नाईक, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.

प्रयोगशील तथा प्रगतशील शेतकरी निखिल मधुकर तेटू यांनी स्वतःचा शेतीवर सेंद्रिय शेतीचे अनेक प्रयोग केले. सुरुवातीस त्यांनी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. तसेच त्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविला. जमिनीत गांडुळांची संख्या वाढविली. स्वतः गांडुळ खत तयार करून स्वतःच्या शेतात वापरले त्यामुळे रासायनिक खत कायमचे बंद केले. नैसर्गिक गांडूळ तयार करण्यात यशस्वी झालेत. शेताच्या बांधावर सेंद्रिय निविष्ठा तयार करून वापर केला. त्यात जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत, निमास्त्र, दशपर्णी अर्क, अग्निस्त्र, ब्रह्मास्त्र, बेलव व आवळा रसायन तयार केले. त्यांनी स्वतःचा शेतात फळबाग लागवड केली आहे. त्यात पेरू, सीताफळ, रामफळ, आवळा, संत्री, मोसंबी, चिक्कू, अंजीर, केळी, निंबू, आंबा, करवंद, फणस ही झाडे लावली असून एकप्रकारे फूड फॉरेस्ट साकारले आहे. त्याच्या प्रत्यक्ष फायदा शेतकरी बांधवांना झाला. त्यांच्या शेतातील निघणारा भाजीपाला, फळे, देशी बियाणे ही सर्व त्यांची स्वतःची बाजारपेठ स्वतः तयार करून स्वतः विक्री करत आहेत.

यात सर्वात मोठा सहभाग शेतकरी निखिल ला त्यांच्या आईबाबा आणि बहीण जावई यांचा आहे तसेच मोठे पाठबळ त्यांना कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग अमरावती, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अमरावती, कृषी विज्ञान केंद्र अमरावती यांचे नेहमी सहकार्य लाभले.

विषमुक्त बियाण्यांची निर्मिती २०२१ पासून त्यांनी परंपरागत विषमुक्त देशी भाजीपाला बियाण्यांचे ते संवर्धक बनले. आता त्यांच्याकडे खरीप हंगामातील भाजीपाला पिके ४८ असून रब्बी हंगामातील भाजीपाला पिके २५ आहे. आणि ते इतर राज्यात सुद्धा देशी बियाणे पोहोचविण्याचे काम करत आहे. तसेच शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहे. अजून नैसर्गिक शेती फॉर्मर मास्टर ट्रेनर म्हणून कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *