![]()
झोन क्र. १ रामपुरी कॅम्पच्या गाडगेनगर परिसरातील द्वारकानगर भागात गुरुवारी २ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नाली स्वच्छ करणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या शहरातील स्वच्छतेचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांद्वारे शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. यामुळे झोन क्र. १ मधील सर्व सफाई कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कामबंद केले. सफाई कर्मचाऱ्यांनी गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये एकत्र येत आक्रमकपणे आंदोलन सुरू केले. मारहाण करणाऱ्या नागरिकांना अटक करण्यात यावी. जोवर अटक होणार नाही, तोवर आम्ही पोलिस ठाण्यातून हलणार नाही, अशी भुमिका घेतली. तसेच अटक झाली नाही तर शुक्रवारपासून संपूर्ण शहरात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाने हातपाय हलवण्यास सुरुवात केली. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी तीन नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळपर्यंत झोन क्र. १ तसेच शहरातील इतरही काही झोनमध्ये सफाईचे काम बंद राहिले. इतर काही सफाई कर्मचारी मनपा मुख्यालयात धडकले. त्यांनी मनपा आयुक्तांना आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा थेट प्रश्न केला. तसेच जोवर आम्हाला न्याय मिळणार नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही. संपूर्ण शहरात आम्ही कामबंद आंदोलन करू, असा इशारा त्यांनी. आमच्या सुरक्षेची जबाबदारी ही मनपा प्रशासन तसेच तक्रार करण्याची सोय, कायदा हाती घेऊ नये अशा सूचना ^स्वच्छतेसाठी सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता स्वच्छतेचे काम मार्गी लागत आहे. अशात काही जणांनी नाली स्वच्छ करीत असतानाच तेथे कचरा आणून टाकला. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. त्यामुळे त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तक्रार करण्याची सोय असताना नागरिकांनी कायदा हाती घेतला. हे योग्य नव्हे. – वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा. मनपासह कोणार्कचा ढिसाळ कारभार या प्रकाराला जबाबदार मागील सहा महिन्यांपासून शहरातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून शहराच्या स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व त्यांना कंत्राट देणारी मनपा या दोघांनाही शहर स्वच्छतेचे योग्य नियोजन अजुनही व्यवस्थित जमले नसल्याने ते अशा प्रकारासाठी कारणीभूत आहेत. कोणार्कबाबत सतत तक्रारी येत असताना मनपा प्रशासनाने आजवर त्यांच्याविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलले नाही. नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे ज्या सफाई कर्मचाऱ्यांचा यात कोणताही दोष नाही ते, बळी पडले. सफाई कर्मचाऱ्यांना शहरभर आंदोलन टाळण्याचा सल्ला संतप्त सफाई कर्मचारी महानगर पालिका मुख्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यावेळी मनपा प्रशासनाने त्यांना दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्याचा सल्ला दिला. तसेच आक्रमक कर्मचारी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देत असल्यामुळे त्यांना मनपा प्रशासनाने झाल्या प्रकारासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरू नका. आंदोलन टाळण्यात यावे, असाही सल्ला दिला आहे.
Source link
‘कोणार्क’च्या दोन कामगारांना मारहाण:पोलिस ठाण्यासमोरच घंटागाड्यांची रांग, झोन क्र. 1 रामपुरी कॅम्पमधील द्वारकानगर परिसरातील प्रकार