Headlines

Aditya Thackeray Attacks BJP On Ram Mandir Donation Scam; Calls For Protest


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी राम मंदिर देणगी व्यवहारांबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या उभारणीचा निर्णय भाजपने घेतला

.

“होसबळेंचं वक्तव्य खूप उशिरा आलं”

आदित्य ठाकरे म्हणाले की, दत्तात्रेय होसबळे यांनी केलेले वक्तव्य खूप उशिरा आले आहे. जर राम मंदिर देणगी व्यवहारात कुणी दोषी असेल, तर सर्वात आधी प्रश्न विचारला पाहिजे की ट्रस्टचे विश्वस्त नेमले कुणी? हे विश्वस्त भाजपप्रणीत केंद्र सरकारनेच नियुक्त केले होते. मग आता केंद्र सरकार स्वतः नियुक्त केलेल्या विश्वस्तांना हटवणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“राम मंदिर भाजपने नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उभं राहिलं”

राम मंदिर उभारणीचे श्रेय भाजप घेऊ शकत नाही, असा दावा करत ठाकरे म्हणाले की, आम्ही त्यावेळी सरकारला अध्यादेश आणण्यास सांगितले होते. मात्र ते धाडस सरकारने दाखवले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये भाजपने आपल्या पसंतीचे सदस्य नियुक्त केले.

“हिंदूंच्या भावनांचा अपमान; पुन्हा आंदोलन करू”

राम मंदिर देणगी व्यवहारांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही पुन्हा एकदा रामजन्मभूमी आंदोलनाप्रमाणे आंदोलन छेडणार आहोत. हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा नसून हिंदू समाजाच्या श्रद्धेचा आणि भावनांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिकेवरही जोरदार टीका

राम मंदिराच्या मुद्द्यासोबतच आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पावसाळी परिस्थिती, महापालिकेचा कारभार आणि अलीकडील दुर्घटनांवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सत्तेत बसलेले लोक प्रत्येक दुर्घटनेनंतर स्वतःची जबाबदारी झटकत आहेत. जेवढे या घटनांसाठी महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, तेवढेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही जबाबदार आहेत.

“मॅनहोल, झाड कोसळणे, मृत्यू… पण जबाबदारी कुणाची?”

गेल्या काही दिवसांत मुंबईत झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला, अशा अनेक दुर्घटना घडल्या. मात्र यावर गंभीर भूमिका घेण्याऐवजी भाजपचे आमदार अमित साटम टिंगलटवाळी करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

“महापौरांसमोर अधिकारी पडला, चौकशी त्याच्यावरच”

नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही, अनेक मॅनहोल अजूनही धोकादायक अवस्थेत आहेत, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी महापौरांच्या उपस्थितीतच एक महापालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला होता. मात्र त्या अधिकाऱ्याची विचारपूस करण्याऐवजी त्याच्याविरुद्ध चौकशी लावण्यात आली. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची घाई असते, पण स्वतःच्या जबाबदारीबाबत मात्र प्रशासन मौन बाळगते, अशी टीका त्यांनी केली.

“100 दिवसांत फक्त 100 खोके जमवण्याचं काम”

राज्य सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारचे लक्ष जनतेच्या प्रश्नांपेक्षा वेगळ्याच गोष्टींकडे आहे. “100 दिवसांत फक्त 100 खोके जमवण्याचं काम सुरू आहे. दुर्घटना घडल्यानंतर त्याची टिंगलटवाळी करायची, हसायचं आणि जबाबदारी झटकायची, हीच सध्याच्या सत्ताधाऱ्यांची कार्यपद्धती झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. अशा घटना घडल्यानंतर संबंधितांची तत्काळ हकालपट्टी व्हायला हवी होती. मात्र, उलट अशा लोकांनाच प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राम मंदिर देणगी व्यवहार, मुंबईतील पावसाळी दुर्घटना आणि महापालिकेच्या कारभारावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर एकाच वेळी जोरदार राजकीय हल्ला चढवत, या सर्व मुद्द्यांवर सरकारला थेट जबाबदार धरले.

संबंधित बातम्या वाचा…

महाआरतीसाठी काँग्रेसची ‘NOC’ घेतली का?:उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदे गटाचा जोरदार पलटवार

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि रविवारी ‘महाआरती’ करण्याची घोषणा केली आहे. “आता हिंदू सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, उदय सामंत, शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर चौफेर टीका केली आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

‘अब हिंदू माफ नहीं करेगा!’:राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरेंचा संताप, दादरमध्ये करणार ‘रामरक्षा आंदोलन’

देशात सध्या अयोध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राम मंदिरात मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला आहे. तसेच येत्या 5 तारखेपासून दादरच्या हनुमान मंदिरासमोर रामरक्षा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे. तसेच जे हिंदू आहेत त्या सर्वांनी तिथे यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

माणसं मेल्यावर सरकार दात काढून निर्लज्जपणे हसतेय:104 टक्के नालेसफाईचा दावा फोल, मुंबई तुंबली अन् कमिशन कोणाचे? संजय राऊतांचा सवाल

मुंबई भाजप अध्यक्षांनी या मृत्यूंची निर्लज्जपणे थट्टा उडवली आहे. ‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील नेत्याची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. सरकारने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळेच या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.