- Marathi News
- National
- Rumors In The Darshan Queue In Bihar… 7 Killed In Stampede, Devotees Had Come To Ashokdham Temple, All The Dead Were Women
लखीसराय1 मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक

बिहारच्या लखीसरायमध्ये सोमवारी चेंगराचेंगरीत ७ महिला भाविकांचा मृत्यू झाला. १४ जण जखमी आहेत. हे भाविक सकाळी ६:३० वाजता अशोकधाम मंदिरात जाण्यासाठी रांगेत उभे होते. याच दरम्यान ही दुर्घटना घडली.
जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले- गर्दी खूप होती. भाविकांची रांग स्टेशनजवळील अशोकधाम हॉल्टपर्यंत पोहोचली होती. याच दरम्यान पुरुषांच्या रांगेच्या उजव्या बाजूला विजेचा खांब पडला. करंट लागल्याची अफवा पसरली. यामुळे डाव्या बाजूला असलेल्या महिलांच्या रांगेवर दबाव वाढला आणि महिला एकमेकींच्या अंगावर पडू लागल्या. अवघ्या दोन मिनिटांत ही वेदनादायी दुर्घटना घडली. घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि प्रशासनाच्या टीमने जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोहोचवले. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
उज्जैन: महाकाल मंदिर परिसरातही अशीच स्थिती
उज्जैन | महाकालेश्वर मंदिर परिसरातील नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीला चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सुमारे १३ भाविकांना किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे, मात्र जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या चेंगराचेंगरीचा इन्कार केला आहे. नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीला उघडते.