![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव, व्यापार व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मोदींसमोर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण केले. पुणे मेट्रो ३ प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मोदींकडे वेळ मागितली. फडणवीसांच्या सादरीकरणात शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीसाठी ८ हजार एकर अतिरिक्त जागा संपादनासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्याचा मुद्दाही समाविष्ट होता. गेल्या दोन महिन्यांतील फडणवीसांचा हा पाचवा दिल्ली दौरा होता. सोमवारी भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होत असतानाच ते दिल्लीत पोहोचले. त्यामुळे ते दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. त्यावर फडणवीस म्हणाले की, रिकामटेकड्यांनी हवेत पतंग उडवावेत. मी महाराष्ट्रातच राहणार आहे. सात गावांमध्ये होणार जमीन संपादनाची मोहीम
१. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीसाठी चित्ते पिंपळगाव, चितेगाव, खोडेगाव, घारदोन, घारदोन तांडा, गाडीवाट गावात भूसंपादन.
२. दिल्ली-नागपूर कॉरिडॉरमध्ये नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे नवीन इंडस्ट्रियल पार्कसाठी ६ हजार एकर जमिनीचे संपादन.
३. दिघी पोर्ट नोडसाठी ६ हजार एकर जागेचे संपादन पूर्ण. केंद्राने दिलेल्या निधीतून प्राथमिक पायाभूत सुविधांच्या कामांचे टेंडर वाटप.
४. मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉरमध्ये नवी एमआयडीसी उभारून केंद्राच्या विशेष योजनेतून राज्याला सर्वाधिक इंडस्ट्रियल पार्क मिळवण्याचा प्रयत्न.
५. ८७, ४२७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित उत्तन-विरार कॉरिडॉरविषयी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेसह अन्य संस्थेकडे निधी मागणार.
अनेक लोकांना मी दिल्लीत जावे असे वाटते : मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत पोहोचताच विरोधकांनी ते दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून जाणार असल्याची चर्चा सुरू केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी कुठेही गेलो तरी चर्चा रंगवणारे अनेक रिकामटेकडे लोक आहेत. मी दिल्लीत गेलो तरी ते चर्चा करतात आणि मुंबईत असलो तरी चर्चा करतात. ज्यांना जे तारे तोडायचे आहेत किंवा हवेत फुगे-पतंग उडवायचे आहेत, त्यांना ते उडवू द्या. अनेक लोकांना मी दिल्लीत जावे असे वाटत असेल. पण राज्यातील जनतेने आणि मोदींनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातच राहून जनतेची सेवा करणार आहे.
Source link
शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीच्या भूसंपादनासाठी फडणवीस दिल्लीत:मोदींसमोर सादरीकरण, 8 हजार एकर जागेसाठी निधीची मागणी