![]()
हिवरखेडा गौताळा रस्त्यावरील मदरसा औरंगजेब आलमगीर येथील २४ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एरंडाच्या बिया बदाम समजून खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. या घटनेत २४ मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ मुलांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी फैजान शेख युसूफ, समीर मोहम्मद अन्सारी, नेहाल शेख नईमुद्दीन, फरान शेख युसूफ, तोहित शेख महंमद, इसहार शेख मनान, बरार शेख आबिद, ईमादिल शेख अशफाक, सलमान शेख नियाज, नवाजिस शेख साहिर, असिजद शेख साबित, गुलाफराज शेख आसिफ, आशिर शेख मेहराज, खुशदिल शेख अश्फाक, मुर्शिद फिरोज शेख, अरमान शेख सलमान, अहेमद अली जागिर, राफे शेख रिजवान, रहेमुल्ला सदिम, इरफान शेख तन्वीर, कम्रान शेख तन्वीर, जिया जियाउद्दीन पठाण आणि रहेमत उल्ला सालीम या २४ विद्यार्थ्यांना दाखल केले. मदरशामध्ये ७० विद्यार्थी घेतात शिक्षण शिक्षक महंमद अरफात यांनी सांगितले की, २०१३ पासून सुरू असलेल्या या मदरशात रेक्टर मुफ्ती महेबुब यांच्या देखरेखीखाली ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी २४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कन्नड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू डॉ. प्रवीण पवार, डॉ. शुभम राजपूत, स्वाती डोळस, चेतन कुमावत, ज्योती हिंगे यांनी मुलांवर उपचार केले. भाजप वैद्यकीय सेलचे डॉ. दिलीपसिंग राजपूत, आकाश बोलधने, नगराध्यक्ष फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद, रईस मुनीर सौदागर, अनिल खंबाट, केतन त्रिभुवन यांनी रुग्णालयात मदतकार्य केले. एरंडीच्या बियांमध्ये रायसीन हे विषारी घटक असतो. रायसीन हे मानवी शरीरातील पेशींची प्रथिने बनवण्याची क्षमता नष्ट करते, ज्यामुळे पेशी मृत पावू लागतात. एरंडीच्या बीचे बाह्य कवच तुटून जर बी चावले किंवा खाल्ली गेली, तर हे विष शरीरात शोषले जाते. बिया खाल्यास तीव्र मळमळ आणि उलट्या होतात.
Source link
बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्ल्या; कन्नडमध्ये 24 विद्यार्थ्यांना विषबाधा:तीन मुलांची प्रकृती गंभीर, हिवरखेडा-गौताळा रस्त्यावरील मदरशामध्ये घडली घटना