![]()
येथे नवरात्रोत्सवानिमित्त पूर्णेश्वर संस्थान व चंडिका माता संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रात्री ९ वाजता पूर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने दशावतारी सोंगांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व मशिदींचे हाफिज साहेब तसेच मुस्लिम बांधवांना संस्थानतर्फे निमंत्रण देण्यात आले असून, या उपक्रमातून गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपण्याचा आदर्श संदेश देण्यात आला आहे. शनिवारी रात्री ८ वाजता गावाबाहेरील चंडिका माता मंदिरापासून देवीचा मुखवटा व पोत घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर पूर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमात स्वच्छ गाव, सुंदर गाव, भंगा-भंगी, गणपती-शारदा नृत्य, हनुमान-रावण युद्ध, डाकिणीपासून बाळाचे संरक्षण, खंडेराव-भानू-म्हाळसा नृत्य, आग्या तळ, नटराज नृत्य तसेच देवीकडून राक्षसाचा वध अशा विविध आकर्षक सोंगांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पूर्णेश्वर संस्थानतर्फे गणेश महाराज यांनी गावातील मुस्लिम बांधवांना दिले. यावेळी अब्दुल समद हाफिज साहेब, याकुब हाफिज साहेब, अबरार हाफिज साहेब, उपसरपंच जलील पठाण, सलीम शेख, कलीम शेख, हर्षद काजी, अक्रम पठाण, जावेद शेख, नैन काजी, अजिम सावकार, अकबर पठाण यांच्यासह पूर्णेश्वर संस्थानचे गणेश महाराज, अशोक मोकासे, मनोज काळे, भूषण झगडे, गणेश लांडगे, बाबासाहेब तारडे, किरण बैस, शेषराव गाडेकर, शिवाजी ढंगारे आदी उपस्थित होते.
Source link
नागापूर:दशावतारी सोंगांचा कार्यक्रम; मुस्लिम बांधवांना निमंत्रण