![]()
कसबे सुकेणे गाव व परिसरात गुरुवारी (दि.१५) पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलासह दोघांवर गंभीर हल्ला केल्याची घटना घडली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी दिवसभरात या कुत्र्याच्या हल्ल्यात आदेश शार्दूल आणि रेल्वे स्टेशनवर काम करणारी आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, परिसरातील एका महिलेवरही कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याची नखे लागल्याने महिला थोडक्यात बचावली. सुदैवाने तिला मोठी दुखापत झाली नाही. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील वर्दळीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. कुत्र्याचा बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला चिमुकला व तरूण.
Source link
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्यासह दोघे गंभीर:कसबे सुकेणे येथील घटना; नागरिकांमध्ये भीती