![]()
विंचूरजवळील सुभाषनगर येथील श्री क्षेत्र लोणजाई माता गडावर गुरुवारी (दि. १५) तालुकास्तरीय श्री दुर्गा सप्तशती सामुदायिक पाठवाचन सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. या सोहळ्यात साधारण २,५०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आजच्या धावपळीच्या जीवनात कुलदेवतेची उपासना व सेवा यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संकेतांतून प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कुलस्वामिनी लोणजाई मातेची सेवा, दुर्गा सप्तशती पाठवाचनाचे महत्त्व आणि धार्मिक परंपरांचे जतन या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात महिलांनी सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठवाचन केले. श्री ललित पंचमीच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांच्या सोयीसाठी श्रीमंदिर, विंचूर येथून मोफत वाहनव्यवस्था करण्यात आली होती. ज्या भाविकांकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ उपलब्ध नव्हता, त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळी कमी किमतीत ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन श्री लोणजाई माता भक्तगण मंडळ, विंचूर व निफाड तालुका सेवेकरी परिवार यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सुभाषनगर येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
Source link
उपक्रम:सुभाषनगरला लोणजाई माता गडावर 2,500 महिलांचे दुर्गा सप्तशतीपाठ