![]()
नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर जात असताना स्कुटीला झालेल्या अपघातात चांदवड पोलिस ठाण्यातील हवालदार राजेंद्र किसन माळी (४९, रा. चांदवड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (दि. १४) सकाळी साडेनऊच्या सुमारास राजेंद्र माळी हे स्कुटीने पोलिस ठाण्याच्या आवारातून बाजारपेठेच्या दिशेने नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जात होते. पोलिस ठाण्याजवळील संघाच्या कार्यालयासमोर त्यांच्या स्कुटीचा अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र माळी हे चांदवड पोलिस ठाण्यात निष्ठेने सेवा बजावत होते. चांदवड व मालेगाव येथे कर्तव्य बजावताना त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता.
Source link
चांदवड:बंदोबस्तासाठी जात असताना हवालदाराचा अपघातात मृत्यू