![]()
अकोला येथे १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी याच्या जळगावातील घरावर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचे घबाड सापडल
.
अटकेत असलेला चौधरी (५७) अकोला येथे सहजिल्हा निबंधक म्हणून कार्यरत आहे. २५ जून २०२६ रोजी लाच घेताना अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली होती. चौधरीचे जळगावच्या गणेश कॉलनीतील साई प्रभा आर्केड हे घर सील केले होते. २८ जूनच्या मध्यरात्री चौधरींच्या नातेवाइकांनी घराचे सील तोडून घरात प्रवेश करत लाचेचा मुद्देमाल व महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एसीबीच्या निरीक्षक स्मिता नवघरे व कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना रंगेहाथ पकडले होते.
जळगावला अधीक्षक होता
जळगावात दोन वर्षे कार्यालय अधीक्षक सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक अधिकारी असलेला किरण चौधरी हा २९ सप्टेंबर १९९७ रोजी शासकीय सेवेत रुजू झाला आहे. तो जळगाव येथे कार्यालय अधीक्षक म्हणून २०२३ ते जून २०२५ दरम्यान कार्यरत होता. त्यानंतर जून २०२५ मध्ये जळगाव येथून अकोला येथे बदलून गेला होता. त्याचे जळगावात घर आहे.