Headlines

6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांच्या राज्याला महत्त्वाच्या सूचना




मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबई-ठाण्यात शाळांना सुट्टी, वाहतूक मंदावली गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, रेल्वे सेवेवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आधीच मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ‘दर तीन तासांनी देतोय अलर्ट, प्रवास टाळा’ शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित ‘सहकार गौरव पुरस्कार’ सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीवर सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून आम्ही हाय अलर्ट जारी केला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून दर तीन तासांनी अलर्ट दिला जात आहे. नागरिकांनी हा अलर्ट फॉलो करावा आणि गरज नसेल तर प्रवास टाळावा, अशी माझी विनंती आहे.” खड्ड्यांवरून विरोधकांना फडणवीसांचे उत्तर पावसाच्या या संकटातच दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे ‘कनेक्टिंग लिंक’वर दोन खड्डे पडल्याचे समोर आले होते. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. फडणवीस म्हणाले, “कनेक्टिंग लिंकवर जिथे रस्ते जोडले जातात, तिथे दोन खड्डे पडले आहेत. पूर्ण लिंकवर खड्डे पडलेले नाहीत. काम पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात दुसरी लेअर टाकली जाते आणि त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी तपासून पाहिल्या जातात. ही एक इंजिनिअरिंग प्रोसेस आहे. कुठे काही कमतरता असेल तर एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेऊन दुरुस्ती करेल. पण, काही लोकांना फक्त टीका करण्यातच आनंद मिळतो. हरकत नाही, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’. आपण देशातील सर्वात उंच पूल, रस्ते आणि धरणे बांधली आहेत, त्यामुळे निव्वळ टीका करणे योग्य नाही.” वसई जलमय; रेड अलर्टमुळे दुपारच्या सत्रातील शाळा-कॉलेजांना सुट्टी
मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर प्रदेशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या दुपारच्या सत्राला आज (४ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संबंधित बातम्या वाचा.. मुंबईत मुसळधार पावसाचा कहर PHOTOS: अनेक ठिकाणी कंबरेएवढे पाणी, कुठे झाडे कोसळली; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत मुंबईकरांची सकाळ पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये कंबरेएवढे पाणी साचल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सविस्तर वाचा राज्यात आडवातिडवा पाऊस:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा गुजरातमध्ये पूर, 19 जणांचे रेस्क्यू: महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस, पालघरमध्ये शाळा – कॉलेज बंद; उज्जैनमध्ये युवक वाहून गेला मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. पण गुजरात – महाराष्ट्राचे काही भाग याला अपवाद आहेत. तत्पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंडरडा परिसरात समधियाळा गावाजवळ पुराच्या पाण्यात चार गाड्या अडकल्या. त्यात अडकलेल्या 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तिकडे महाराष्ट्रातील नालासोपारा येथे रेल्वे स्टेशनबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. प्रवाशांना पाण्यातून वाट काढत स्टेशनवर पोहोचावे लागत आहे. पालघरमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा पर्यटकांची प्रतीक्षा संपली: लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले शुभ्र पाण्याचे प्रवाह पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *