![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी पैठण येथील उपनिबंधक कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ ते १२ या चार तासांत उत्साहात मतदान झाले. विविध मतदारसंघांतील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत दुपारी १२ वाजेपर्यंत ८६.६६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची व मतदारांची चांगली गर्दी पाहायला मिळाली. मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास संस्था मतदारसंघात ८८ पैकी ७९ मतदारांनी (८९.७७ टक्के) मतदान केले. बिगरशेती मतदारसंघात १६ पैकी ११ मतदारांनी (६८.७५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. तर पणन प्रक्रिया मतदारसंघातील एकमेव मतदाराने (१०० टक्के) मतदान केले. यामुळे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १०५ पैकी ९१ मतदारांनी मतदान केल्याने मतदानाची टक्केवारी ८६.६६ इतकी नोंदविण्यात आली. मतदान अधिकारी तथा उपनिबंधक बलराम नवथर यांनी ही माहिती दिली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू असून संध्याकाळी एकुण किती मतदान होणार हे स्पष्ट होईल. हेही वाचा.. आमचे ‘ऑपरेशन 3.0’ सुरू:लवकरच महाभूकंप होणार; संजय शिरसाट यांचा मोठा दावा; ठाकरेंवरही साधला निशाणा
राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वेग घेण्याची शक्यता असून सत्ताधारी शिवसेनेचे ‘ऑपरेशन 3.0’ सुरू झाले आहे. लवकरच एक मोठा ‘महाभूकंप’ पाहायला मिळेल, असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत केला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या घंटानाद आंदोलनावर आणि संजय राऊत यांच्या टीकेवरही त्यांनी सडकून टीका केली. सविस्तर वाचा
Source link
जिल्हा बँक निवडणूक:पैठणमध्ये 4 तासांत 86.66 टक्के मतदान, आमदार विलास भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क