![]()
गोल्डलिफ एन्टरटेन्मेंटतर्फे तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 12 जुलै 2026 रोजी करण्यात आले आहे. सदू शिंदे क्रिकेट मैदानावर ही मॅरेथॉन होणार असून, ती पूर्णपणे इको-फ्रेंडली असेल. आयोजक अथर्व अय्यर यांनी सांगितले की, दुसऱ्या आवृत्तीला मिळालेल्या प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. या मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिक आणि कार्बनचा वापर शून्य असेल. जंपस्टार्ट इंटरनॅशनल स्कूल आणि गोल्डलिफ एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 4 जुलै 2026 रोजी तळजाई येथे 2 ते 10 वर्षांखालील मुलांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमही राबवण्यात आला. या वर्षी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनमध्ये ‘पावाथॉन’ या तीन किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीचे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत स्पर्धक आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सहभागी होऊ शकतील. यामुळे पाळीव प्राण्यांसोबतचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल आणि पुणेकरांना निसर्गाचा व पावसाळी वातावरणाचा आनंद घेता येईल, असे अय्यर यांनी नमूद केले. प्रत्येक धावपटूला एक रोपटे दिले जाईल. शर्यतीच्या मार्गावर पुनर्वापर केलेले पाणी उपलब्ध असेल. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला गुडी बॅग, पदक, नाश्ता, मार्ग सहाय्यक, गिफ्ट व्हाऊचर आणि ई-प्रमाणपत्र दिले जाईल. 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरू होऊन तळजाई डोंगर, पद्मावती पार्किंग, ट्रेझर पार्क मार्गे अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज चौक मार्गे पुन्हा सदू शिंदे क्रिकेट मैदानावर संपेल. 10 किलोमीटरची शर्यत दोन टप्प्यात, तर 5 किलोमीटरची शर्यत एका टप्प्यात धावली जाईल. स्पर्धेत एकूण 50,000 रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. सहभागी होण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2026 आहे. ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनसाठी नावनोंदणी https://www.townscript.com/e/green-pune-monsoon-hill-marathon-3-323244 या संकेतस्थळावर करता येईल. अधिक माहितीसाठी मीरा सामंत (मोबाईल: 7219804030) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Source link
तिसरी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन 12 जुलैला:शून्य प्लॅस्टिक, शून्य कार्बन वापर; पाळीव प्राण्यांसाठी 'पावाथॉन' शर्यत