Headlines

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय प्रस्थान:24 जुलैला पंढरपुरात होणार आगमन; अठरा दिवस संतविचारांचा महोत्सव‎




संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र आपेगावातून सोमवारी (६ जुलै) सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या माता-पिता पालखी, दिंडी व रथ सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, आमदार विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षा भुमरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पोपट औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” , “ज्ञानोबा माउली”च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या गजराने, वीणेच्या मंजूळ स्वरांनी आणि भगव्या पताकांच्या डौलदार लयीत संपूर्ण आपेगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा ऐतिहासिक सोहळा भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचे अनोखे दर्शन घडवून गेला. प्रस्थानापूर्वी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वेदमंत्रांच्या घोषात धार्मिक विधी, महापूजा आणि आरती ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर पैठणच्या नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, भूषण कावसानकर यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन झाले. ज्ञानेश्वर महाराज (दादा) कोल्हापूरकर म्हणाले, “ही दिंडी केवळ पायी यात्रा नाही, ती संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांची, समाजप्रबोधनाची आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तिपरंपरेची चालतीबोलती शाळा आहे. प्रत्येक गावातील भाविकांचा सहभाग हीच या पालखीची खरी शक्ती आहे. पालखीचा पहिला मुक्काम श्रीक्षेत्र आपेगाव येथील माता-पिता मुक्ताई मंदिरात होणार आहे. त्यानंतर बोरगाव, बोधेगाव, दराडे वस्ती, बोरगाव संस्था, आर्वी, नागरेची वाडी, नाळवंडी, विष्णू गुजर पाटोदा, पारगाव घुमरे, जायभायवाडी, खर्डा, आंबी, कंडारी, परंडा, भागचंद धोका, सांतासेवा मंडप, आरण, मेंढापूर आदी गावांतून पालखीचा प्रवास होणार आहे. माउलींच्या विचारांची चालतीबोलती शाळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *