Headlines

विवाह संस्कारातून निसर्ग अन् ज्ञानाची पेरणी, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन वधू-वराची मंगल प्रवेशिका‎




आजकालच्या विवाह सोहळ्यांवर पाश्चात्य संस्कृतीसह बडेजावाचा मोठा प्रभाव दिसून येतो. लाखो रुपयांची उधळपट्टी, डीजेचा दणदणाट आणि दिखाऊपणा यामध्येच लग्नाची इतिकर्तव्यता मानली जात असताना, अमरावतीत एका विवाह सोहळ्याने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. नांदगाव पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुळे आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी कलगा येथील प्रियंका तुपटकर यांच्या विवाह सोहळ्यात भारतीय संस्कृती, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणत त्यांनी पाहुण्यांना ग्रामगीता आणि वृक्ष भेट दिले. रविवारी ५ जुलै रोजी अमरावती येथे हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने आणि मूल्याधिष्ठित पद्धतीने पार पडला. या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती वधू-वरांची लग्न मंडपातील एन्ट्री. पाश्चात्य पद्धतीचे संगीत किंवा नाच-गाणे न करता, वधू-वरांनी हातात लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा घेऊन मंगल कार्यालयात प्रवेश केला. महापुरुषांच्या विचारांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही ‘मंगल प्रवेशिका’ उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेली. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून, ती समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे, हाच संदेश यातून देण्यात आला. लग्नात फुलांचे महागडे गुच्छ किंवा प्लास्टिकच्या निरुपयोगी वस्तू देण्याच्या प्रथेला या नवदाम्पत्याने फाटा दिला. विवाह सोहळ्याला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ‘ग्रामगीता’ हा महान ग्रंथ आणि पर्यावरणाचे रक्षण करणारे ‘वृक्ष रोप’ भेट म्हणून देण्यात आले. या अनोख्या उपक्रमातून एकाच वेळी ज्ञान, संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाचा त्रिवेणी संदेश देण्यात आला. दिखाऊपणा आणि आधुनिकतेच्या नावाखाली होणारा अवाढव्य खर्च टाळून, या नवदाम्पत्याने समाजाला एक नवी आणि योग्य दिशा दिली आहे. या अनोख्या विवाहाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, लग्न असावे तर असे, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटत आहेत. “लग्नातील अवाजवी खर्च टाळून जर आपण समाजाला आणि निसर्गाला काही देऊ शकलो, तरच खऱ्या अर्थाने नवीन आयुष्याची सुरुवात सार्थ ठरेल. हाच विचार करून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. दिखाऊपणा, अवाढव्य खर्च टाळून साधेपणा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *